ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे मांडणे आणि डिजिटल सेवा अधिक सक्षम, पारदर्शक व दर्जेदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधन, सेवा अटी व कामाच्या स्वरूपाबाबत न्याय मिळवून देणे
शासन निर्णय (GR), परिपत्रके व डिजिटल अपडेट्सची अचूक माहिती सदस्यांपर्यंत पोहोचवणे
ई-ग्रामस्वराज, CSC, महा-ई-ग्राम व इतर सरकारी पोर्टल्सबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे
परिचालकांसाठी एक मजबूत, संघटित आणि विश्वासार्ह व्यासपीठ तयार करणे
तांत्रिक अडचणी व तक्रारींचे संघटनेच्या माध्यमातून निवारण करणे
ग्रामीण भागातील डिजिटल सेवा अधिक सक्षम करण्यासाठी परिचालकांचे कौशल्य विकसित करणे